रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
Published on

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
भिवंडी, ता.१८ (बातमीदार): भिवंडी अंजूर मार्गावरील मेट्रो ब्रिज खालून घरच्या दिशेने निघालेल्या दुचाकीचालक रिक्षाने दिलेल्या धडकेत जखमी झाला आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली असून याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दरगाह रोड येथे राहणार अब्दुल वाहिद शेख (५२) मंगळवारी (ता.१७)दुपारी भिवंडी अंजूर ब्रीज खालून दुचाकीवर घरच्या दिशेने निघाले होते. यावेळी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत रिक्षाचालक इरशादने अब्दुलच्या दुचाकीला डाव्या बाजूने धडक दिली होती. या अपघातात अब्दुल गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अब्दुल यांचा मुलगा अदनानच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com