भरधाव कारची दुचाकींना धडक

भरधाव कारची दुचाकींना धडक
Published on

भरधाव कारची दुचाकींना धडक
एक ठार, चार जखमी; चालक फरार

कर्जत, ता. १८ (बातमीदार) : मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव कारने तीन दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली. नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील कळंबजवळील भागुचीवाडी येथील या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मुरबाडहून कर्जतकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. ही घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर आपटले, त्याचवेळी मागून येणाऱ्या तिसऱ्या दुचाकीनेही या अपघातग्रस्त दुचाकींना धडक दिली. या अपघातात धनाजी हनुमंत सोंगाळ (वय ३०) रा. वडाचीवाडी, ता. मुरबाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर अरुण सोंगाळ, विष्णू सोंगाळ, बबलू मेंगाळ आणि विजय मेंगाळ हे चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुरबाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर कारचालक शैलेश दशरथ देशमुख (रा. जडई, ता. मुरबाड) घटनास्थळावरून फरार झाला. त्याने जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा तपास नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वसावे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com