महिला रुग्णाचे मंगळसूत्र चोरीला

महिला रुग्णाचे मंगळसूत्र चोरीला
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : डोंबिवलीतील फडके रोडवरील एका खासगी रुग्णालयात २८ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. रुग्ण महिलेने रविवारी (ता. १६) सकाळी आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून उशीखाली ठेवले होते. चोरट्याने रुग्णालयात घुसून या महिलेचे मंगळसूत्र लांबविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रूग्ण महिलेच्या पतीने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपर गावात स्वरा गॅलेक्सी सोसायटीमध्ये राहणारे अमोल शंकरराव वाघमारे (वय ३६) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अमोल वाघमारे यांची पत्नी अलका (वय २८) उपचारासाठी डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांच्या गळ्यात ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र होते. झोपेत असताना हे मंगळसूत्र मानेला टोचते म्हणून त्यां‍नी ते उशाखाली ठेवले. वैद्यकीय उपचारासाठी उठल्यानंतर नऊच्या सुमारास मंगळसूत्र गळ्यात घालण्यासाठी उशीखाली हात घातला. मात्र मंगळसूत्र हाती लागले नाही. सर्वत्र तपासले तरी मंगळसूत्र आढळून आले नाही. याप्रकरणी अलका यांचे पती अमोल वाघमारे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com