

नीलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाची सूचना फेटाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर सदस्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून दूर करण्यासाठी प्रस्तावाची सूचना दिली होती. या सूचनेत तांत्रिक त्रुटी आढळल्याने ती सूचना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी फेटाळली. ५ मार्चला ही सूचना दाखल करण्यात आली होती.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १८३ (ग) आणि महाराष्ट्र विधान परिषद नियम ११ व १०३ नुसार, अशा प्रकारच्या ठरावासाठी किमान १४ दिवसांची नोटीस आवश्यक असते. तसेच ठरावात नेमका स्पष्ट आणि निश्चित मुद्दा उपस्थित करणे बंधनकारक आहे. म्हणूनच प्राप्त सूचनेत कोणताही स्पष्ट मुद्दा नसल्याने ती अस्वीकार्य ठरवण्यात आली आहे, असे राम शिंदे यांनी स्पष्ट केले. सभागृहात घेतलेल्या निर्णयानुसार, उपसभापतींना त्यांची बाजू मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तसेच ठरावाचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार योग्य प्रक्रियेचे पालन न झाल्यास ठराव स्वीकारला जाऊ शकत नाही. या सर्व कारणांमुळे सभापतींनी सदर सूचना फेटाळली. या निर्णयावर तपशील स्पष्ट करताना सभापती राम शिंदे म्हणाले, ‘‘उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून दूर करण्याबाबत दिलेली प्रस्तुत सूचना अस्वीकार्य ठरते. त्यामुळे या सूचनेस मी अनुमती नाकारत आहे.’’ विधान परिषदेत यावर कोणतीही पुढील कार्यवाही केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.