बॉम्बे आयआयटीची पालिकेकडून नेमणूक

बॉम्बे आयआयटीची पालिकेकडून नेमणूक
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे पालिका क्षेत्रातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. अशातच डायघर येथे शास्त्रोक्तपध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला. मात्र, वर्ष उलटूनही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात झालेली नाही. अशातच ठेकेदाराने पालिकेकडे ७९ कोटींच्या देयकांची मागणी केली आहे. पण पालिकेने सावध भूमिका घेताना बॉम्बे आयआयटीकडून देयकांच्या पडताळणीचा निर्णय घेतला आहे.
डायघर येथील हक्काच्या जागेवर कचऱ्याची शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प महापालिकेने १५ वर्षापूर्वी हाती घेतला होता. याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती होणार होती.पहिल्या टप्यात कचऱ्याचे वर्गीकरण करुन दुसऱ्या टप्यात हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार होता. त्यानुसार त्याला लागणारी साधनसामग्री उपलब्ध झाली आहे. दीड वर्षांपासून या ठिकाणी कचरा देखील साठवला जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या विरोधात येथील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच ठेकेदाराने ७९ कोटींचे देयक पालिकेला पाठवले आहे. यापूर्वी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला २७ कोटींचे देयक अदा केले आहे. परंतु, आता ७९ कोटींचे देयक सादर केल्याने महापालिका बॉम्बे आयआयटीची मदत घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com