वडाळ्यात भव्य जीएसटी भवन

वडाळ्यात भव्य जीएसटी भवन
Published on

वडाळ्यात भव्य जीएसटी भवन
३५ लाख चौरस मीटर जागा उपलब्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्य आणि केंद्र सरकारच्या महसुलाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी विभागाच्या मुख्यालयाची ‘जीएसटी भवन’ची तब्बल २४ मजली टोलेजंग इमारत वडाळ्यात उभी राहत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून हे काम केले जात असून, गेल्या तीन वर्षांत तब्बल १३ मजले म्हणजे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत तीन व्यावसायिक इमारती आणि एक निवासी इमारत अशा चार इमारती असून, सुमारे २६४६ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
जीएसटीच्या माध्यमातून सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. त्यामुळे सध्या ठिकठिकाणी असेलेली जीएसटी विभागाची कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी राज्य सरकार एमएसआरडीसीच्या माध्यमातून जीएसटी भवन उभारत आहे. या माध्यमातून येथे तब्बल ३५ लाख चौरस मीटर वापरण्यायोग्य जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या इमारतीत जीएसटी विभागाबरोबरच वेगवेगळी सरकारी कार्यालये थाटण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे, तर निवासी इमारत जीएसटी विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. दरम्यान, सदर इमारतींचे काम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र इमारतीचे दोन मजले वाढवण्यात आल्याने काम पूर्ण करण्यासाठी २०२७ उजाडणार असल्याचे दिसत आहे.

१० हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता
जीएसटी भवनाची इमारत भव्य असणार आहे. यामध्ये जीएसटी कार्यालयाबरोबरच सरकारची इतर कार्यालये असणार आहेत. त्याची दखल घेत सुमारे आठ हजार कर्मचारी आणि दोन हजार अभ्यागत अशी एकूण १० हजार लोकांना सामावून घेण्याची या कार्यालयाची क्षमता असणार आहे.

पर्यावरणपूरक इमारत असणार; पाणी, विजेची बचत होणार
जीएसटी भवनाची इमारत पर्यावरणपूरक असणार आहे. पर्यावरणाचा अभ्यास करूनच त्याची रचना केली जात असल्याने भविष्यात या इमारतीतील हवा खेळती राहणार आहे, जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येईल, अशी रचना केली जात असल्याने विजेची बचत होऊ शकणर आहे. तसेच पाण्याची बचत व्हावी म्हणून विशेष व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com