पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर चकाचक

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर चकाचक
Published on

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग चकाचक
विशेष स्वच्छता मोहिमेत १६ किमी रस्ते झाले स्वच्छ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः महापालिकेकडून मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्गांची व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत १६ किमीचे महामार्गावर चकाचक झाले, असून काल पहिल्या दिवशी २५ टन राडारोडा, चार टन कचरा गोळा करण्यात आला आहे. ही मोहीम येत्या २२ मार्चपर्यंत रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर १७ ते २२ मार्चपर्यंत मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात सोमवारी (ता. १७) रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव, तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे येथून झाली. पूर्व द्रुतगती महामार्गावरील एकूण ८.८ किलोमीटर, तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एकूण ७.८ किलोमीटर अशी मिळून एकूण १६.३ किलोमीटच्या रस्त्याची पहिल्या दिवशी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये २५ टन राडारोडा, चार टन कचरा आणि ५.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स, लिटर पिकर्स, मिस्टिंग मशीन, डंपर आणि वॉटर टँकर्स अशा एकूण १६ यांत्रिक स्वच्छता संयंत्रांचा या मोहीमेत समावेश होता.
-----
अत्याधुनिक साहित्यांचा वापर
धूळ निर्मूलनासाठी यांत्रिक झाडू तसेच स्वच्छतेसाठी जेटींग, प्रेशर वॉशर यासारख्या संयंत्राचा वापर केला जात आहे. तसेच रस्त्यावरील वाहतुकीसाठीची सांकेतिक चिन्हे, चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांचीही स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरूस्ती केली जात आहे. द्रुतगती महामार्गालगतच्या कचरा पेट्यांमधील कचरा आणि संकलित केलेला राडारोडा वाहून नेणे, रोपे आणि झाडांभोवतीच्या कुंपणाचा कचरा काढणे, झाडांच्या बुंध्यांची रंगरंगोटी करणे, बस थांब्यावरील आसन व्यवस्था नीट करणे, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, जुन्या वाहनांची विल्हेवाट, अशी सर्व कामे या मोहिमेअंतर्गत करण्यात येत असल्याचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com