महाड मुक्तिसंग्रामाला पुन्हा उजाळा

महाड मुक्तिसंग्रामाला पुन्हा उजाळा

Published on

राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. २५ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर केलेल्या पाण्याच्या हक्काच्या लढ्याकडे मानवाधिकाराचा संग्राम म्हणून पाहिले जाते. या लढाईत ठाणे न्यायालयाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याचा ठेवा न्यायालयांमध्ये असावा, यासाठी ठाणे जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये महाड मुक्तिसंग्राम ग्रंथाचे वाटप करण्यात आले आहे.
पाण्याच्या मूलभूत हक्क प्राप्तीसाठी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना सोबत घेऊन चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले होते. हिंदूंनी हक्क नाकारल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी पुन्हा चवदार तळ्यावर सत्याग्रह करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हिंदूंच्या वतीने सबंध अस्पृश्यांविरुद्ध पांडुरंग धारप व इतरांनी डॉ. भीमराव आंबेडकर आणि इतरांच्या विरोधात १२ डिसेंबर १९२७ला महाड न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. मूलभूत हक्क प्राप्तीसाठी आंबेडकरांना १२ डिसेंबर १९९७ ते १७ मार्च १९३७ अशी १० वर्षे कायदेशीर न्यायालयीन लढाई करावी लागली. महाड दिवाणी न्यायालयाने आंबेडकरांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाणे जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले होते; मात्र ठाणे जिल्हा न्यायालयानेही महाड न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. तत्कालीन न्यायाधीश व्ही.आर. सराफ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बाजू ऐकल्यानंतर ८ जानेवारी १९३१ला अस्पृश्यांच्या बाजूने निकाल दिला होता.
----------------------------------------
न्यायिक प्रक्रियेसाठी मार्गदर्शक
ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्येही न्यायिक प्रक्रियेच्या अभ्यासाकरिता हा ग्रंथ असावा, या हेतूने ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्हा न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे लिखित हा अनमोल ग्रंथ सर्व तालुका न्यायालयांना दिला आहे. महाड येथील चवदार तळ्याच्या क्रांतिदिनापासून ग्रंथाचे वितरण केले सुरू असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com