इंद्रिया ज्वेलरीचा सीवूड्समध्ये शुभारंभ
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : आदित्य बिर्ला यांचा ज्वेलरी ब्रँड ‘इंद्रिया’च्या तिसऱ्या दालनाचा शुभारंभ सीवूड्स येथी नेक्सास मॉलमध्ये नुकताच करण्यात आला. केवळ एका आठवड्यात हैदराबादमध्ये दोन नवीन दालने खुली करण्यात आली आहेत. जुलै महिन्यात पदार्पण केल्यापासून, इंद्रिया ज्वेलरीने दिल्लीमध्ये पाच; तर मुंबई, पुणे, जयपूर, अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये प्रत्येकी दोन आणि इंदूर आणि सुरतमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण १७ दालनांसह भारतभर आपली उपस्थिती वेगाने वाढवली आहे. सुमारे १६ हजार तयार केलेले अलंकार आणि पाच हजारहून अधिक डिझाईन येथे उपलब्ध आहेत. मुंबईत जुनी आणि आधुनिक संस्कृती असल्यामुळे येथील नागरिकांना उत्कृष्ट हस्तकला तसेच कालातीत अभिजाततेबद्दल सखोल कौतुक आहे. त्यामुळे इंद्रिया येथील नागरिकांची गरजा पूर्ण करेल, असा विश्वास इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

