कुणाल कामरा विरोधात बोळींज पोलिसात तक्रार
कुणाल कामराविरोधात बोळिंज पोलिसात तक्रार
विरारमध्ये शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा
विरार, ता. २५ (बातमीदार) : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून टीका केली. याविरोधात विरार येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोळिंज पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
कुणाल कामरा याने सार्वजनिक भावनांना दुखावणारे विधान केले, अश्लील शब्दांचा वापर केला आणि एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपमानकारक व बदनामीकारक सूचक विधाने केल्याची तक्रार निवेदनात केली आहे. हे कृत्य कायदेशीरदृष्ट्या गुन्हेगारी स्वरूपाचे असून भारतीय न्याय संहिता २०२३च्या तरतुदींचे उल्लंघन करणारे असून याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने बोळिंज येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश कावळे यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी वसई तालुका संघटक अश्विनी चव्हाण, विरार शहरप्रमुख रोहन चव्हाण, उपशहरप्रमुख नरेंद्र आचरेकर, महिला शहर संघटिका आशा शिरसाठ, उपशहर संघटिका अनुषा पेनगोंडा, विभागप्रमुख लॉयट बॅप्टिस्ता, विभाग संघटिका रेवती देसाई, शाखा संघटिका प्रतिभा खानविलकर आदी उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

