तलावांचे संवर्धन सगळ्यांची जबाबदारी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : परिसरात ६० हून अधिक तलाव असल्याची नोंद इतिहासात आहे. त्यापैकी ४२ तलाव सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे पालिका क्षेत्रातील तलावांच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचे मत ठाणे पालिका शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केले.
जागतिक वन, जल आणि जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.
तलावांचे प्रकार, निरोगी आणि आजारी तलावांची लक्षणे, तलावांचे जैव साखळीतील महत्त्व याचे विवेचन नूतन बांदेकर यांनी केले. प्रत्येक तलावांची माहिती घेताना त्याच्या इतिहासाचा अभ्यास केला. त्यातून तलावांचे महत्त्व अधोरेखित झाले. आपण सगळ्यांनी या तलावांची काळजी घेतली पाहिजे. तलावांच्या स्थितीबाबत जागरूक राहिले पाहिजे. तलावात कचरा, मासे आणि पक्ष्यांना खाणे टाकले जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. मासुंदा तलावापासून वागळे इस्टेटमधील सीपी टॅंकपर्यंत सर्व तलावांचे सचित्र सादरीकरण बांदेकर यांनी यावेळी केले.
................................
तलावांबाबत जागरूकता अभियान
ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या समन्वयाने सुरू असलेल्या ‘माझा तलाव’ ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेत तलावांना भेटी, तलावांबाबत जागरूकता आदी उपक्रम हाती घेण्यात येतात. त्यात विद्यार्थ्यांपासून सर्वच ठाणेकर उत्साहाने सहभागी होत आहेत.
-------------------------------------
‘माझी वसुंधरा’ अभियानातंर्गत उपक्रम
मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा या अभियानाची माहिती दिली. अभियानात जनजागृतीसाठी नागरी सहभागावर भर देण्यात आला आहे. तसेच, नागरिकांनी इ-प्रतिज्ञा घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

