‘नाईट लाइफ’ उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर

‘नाईट लाइफ’ उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर

Published on

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : गुन्हेगारी, गोंधळ आणि रात्रभर सुरू असलेल्या मद्यविक्रीने हैराण झालेल्या उल्हासनगरकरांच्या तक्रारींना अखेर न्याय मिळू लागला आहे. मध्यरात्री २-३ वाजेपर्यंत सुरू असलेल्या मद्यविक्रीवर लगाम घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३ परिसरात मोठी कारवाई केली आहे.
गीता भवन, अंश पॅलेस, साई हॉटेल, मिट वाटिका यांसारख्या बार व परमिट रूम्सना तत्काळ सील ठोकण्यात आले आहे. यामुळे बारचालकांचे धाबे दणाणले आहेत.

शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमागे रात्री उशिरा सुरू असलेली दारूविक्री हेच प्रमुख कारण आहे. हे जीपीएस व्हिडिओ फुटेजमधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. उल्हासनगरकरांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले असतानाही काही बारचालकांना आश्रय मिळत असल्याची जोरदार चर्चा आहे. जॉली बार, न्यू नीलम, देव प्लाझा, न्यू देव प्लाझा, हिरेन पॉईंट यांसारखे अनेक बार अद्यापही मध्यरात्री २-३ पर्यंत सुरू असल्याचे उघड झाले आहे. मद्यपींच्या दारूच्या नशेत गोंधळ घालण्याच्या घटना, कुटुंबांना होणारा मानसिक त्रास आणि बिनधास्त सुरू असलेली बेकायदा विक्री यामुळे संतप्त नागरिकांनी आवाज उठवला आहे. ‘गुन्हेगारी थांबवायची असेल, तर या दारूच्या रात्रीच्या अड्ड्यांवर कायमस्वरूपी बंदी आणा’, अशी मागणी केली जात आहे.

कठोर कारवाईची शक्यता
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ही फक्त सुरुवात आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि कठोर दंडात्मक कारवाया होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये इतरही बार आणि हॉटेल्सवर कारवाईची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com