निकृष्ट रस्त्यामुळे प्रवास खडतर
मुरबाड, ता.२५ (बातमीदार)ः तालुक्यातील नांदगाव फाटा ते पाडाळे मिल्हे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या प्रकरणी जून २०२३ पासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागाचे अधिकारी, बांधकाम विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने प्रवास अतिशय खडतर झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
नांदगाव फाटा ते पाडाळे मिल्हे रस्त्याचे २०२० ते २०२२ मध्ये काम सुरू झाले होते. पण ठेकेदाराने अर्धवटच काम ठेवल्याने गेली तीन वर्षे नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. या कामावरून तहसीलदार कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारा मार्च रोजी तहसीलदारांनी कार्यालयात बैठक ठरवण्यात आली होती. पण तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहिले नसल्याने ग्रामस्थांना माघारी परतावे लागले होते. त्यानंतर आजतागायत प्रशासनाने सभा घेतली नसल्याने ग्रामस्थांवर खडतर प्रवासाची वेळ आली आहे.
-----------------------------------
सात कोटींचा खर्च वाया
अकरा किलोमीटरच्या रस्त्यासाठी सात कोटींचा खर्च करण्यात आला आहे. एका वर्षांत रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे नांदगाव फाटा ते पाडाळे मिल्हे ग्रामस्थांसाठी चांगला रस्ता तयार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

