बिल्डर असोसिएशनची तहसिलदारांसोबत भेट
अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) : अंबरनाथ, बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत शहराच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि बिल्डरांच्या अडचणी वाढवणाऱ्या दलाल, तसेच काही तलाठीकडून बिल्डरांची गळचेपी होत आहे, असे सांगण्यात आले. तसेच, असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव यांनी तहसीलदारांपुढे सर्व समस्यांचा पाढा वाचला. असोसिएशनला या त्रासातून कशी मुक्ती मिळेल, याविषयी सविस्तर चर्चा केली.
सध्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात बांधकाम आणि विकासकामे सुरू आहेत. दोन्ही शहरांचे झपाट्याने विकास होत आहे. मात्र, काही दलाल अधिकाऱ्यांच्या दालनात बसून माहिती काढून बिल्डरांना ब्लॅकमेल करत आहेत, असे असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत आरोप केले होते. यामुळे बिल्डर लॉबीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विकासकामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अमित पुरी यांची त्यांच्या कार्यालयात सोमवारी भेट घेत समस्या मांडल्या. तसेच आजही महसूल आणि रॉयल्टीच्या नावाखाली बिल्डरांची तलाठी व सर्कल अधिकारी अडवणूक करत असल्याचा गौप्यस्फोट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी असोसिएशनचे सचिव ज्ञानधर मिश्रा, कोषाध्यक्ष अमित मोर्यांनी, उपाध्यक्ष संभाजी शिंदे, सहाय्यक कोषाध्यक्ष रूपेश दलाल, सहाय्यक सचिव प्रमोद पाटील, उपाध्यक्ष नवीन बन्सल, नवीन शहा, जगदीश भंजन, कमिटी सदस्य स्वामी, राजेश खांबाईक, उपाध्यक्ष अखिल देसाई उपस्थित होते.
ज्या बिल्डरांना जाणीवपूर्वक काही असामाजिक तत्त्वाकडून त्रास दिला जात आहे, हे निदर्शनास आले आहे. सरकारी स्तरावर शहरातील विकसकांना, बिल्डर असोसिएशनला शक्य तितकी मदत केली जाईल.
- अमित पुरी, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

