डॉ. अमर द्विवेदी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. अमर द्विवेदी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Published on

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने रविवारी (ता. २३) मिरा रोड येथे अखिल राष्ट्रीय परिसंवाद आयुर्बोध-२५चे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या उद्‍घाटन सत्रात नेरूळ येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपप्राचार्य डॉ. अमर द्विवेदी यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेद ॲण्ड बेसिक फ्रॅक्चर मॅनेजमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा आणि प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड यांच्या हस्ते पार पडले. या वेळी आयुष मंत्रालय आणि आयोगाचे संयोजक डॉ. आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रार डॉ. दिलीप वांगे आदी मान्यवर तसेच कार्यक्रमाचे आयोजक आणि पदाधिकारी डॉ. अनिल दुबे, डॉ. छोटेलाल शर्मा, डॉ. प्रवीण जोशी, अध्यक्ष डॉ. सतीश भट्टड आदी मान्यवर उपस्थित होते. नालासोपारा येथील श्री नरसिंह दुबे मेडिकल कॉलेजच्या संचालक डॉ. रुजुता दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या परिसंवाद कार्यक्रमात देशभरातून जवळपास एक हजार आयुर्वेद चिकित्सक आणि स्नातक विद्यार्थी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com