ट्रान्सफॉर्मरमधून ऑइलची चोरी
ट्रान्स्फॉर्मरमधून ऑइलची चोरी
वरई राइस मिलचा वीजपुरवठा खंडित
मनोर, ता. २५ (बातमीदार) : ट्रान्स्फॉर्मरमधील महागडे ऑइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरई नाका भागातील ट्रान्स्फॉर्मरमधून चोरट्यांनी अडीचशे लिटर ट्रान्स्फॉर्मर ऑइलची चोरी केली. त्यामुळे वरई फाटा राइस मिलचा वीजपुरवठा एक दिवसासाठी खंडित झाला होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. दरम्यान, महावितरण कंपनीकडून ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती आणि नवीन ऑइल टाकून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील राइस मिलचा शुक्रवारी पहाटेपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. लोखंडी मनोऱ्यावरील ट्रान्स्फॉर्मर खाली पडलेला आढळून आला. ट्रान्स्फॉर्मरच्या ठिकाणी ऑइल सांडलेले आढळून आले, तसेच ट्रान्स्फॉर्मर तीन भागांत टाकून देण्यात आला होता. ट्रान्स्फॉर्मरमधील महागड्या ऑइलची चोरी करून चोरटे पसार झाले होते. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ट्रान्स्फॉर्मरची किरकोळ दुरुस्ती केली. त्यानंतर ट्रान्स्फॉर्मर नव्याने ऑइल टाकून राइस मिल परिसराचा वीजपुरवठा सुरू केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

