हरवलेलं ऐवज मूळ मालकांना सुपुर्द

हरवलेलं ऐवज मूळ मालकांना सुपुर्द

Published on

हरवलेला ऐवज मूळ मालकांना सुपूर्द
मुलुंड, ता. २५ (बातमीदार) ः मुलुंड पश्चिमेतील रहिवासी शकुंतला रमेश जाधव (६५) यांचा मोबाईल जानेवारी महिन्यात प्रवासादरम्यान हरवला होता. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने मोबाईल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. शनिवारी (ता. २२) हरवलेले १० मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. मोबाईल वितरण कार्यक्रम परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोशी, पोलिस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कामगिरीसाठी मुलुंड सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक अमोल बोरसे आणि शिवानंद आपुणे व त्यांच्या पथकांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com