निर्मळ, भुईगाव कडकडीत बंद

निर्मळ, भुईगाव कडकडीत बंद

Published on

निर्मळ, भुईगावात कडकडीत बंद
डॉ. नीलम पंडित यांच्या अपघाती मृत्यूने शोककळा
वसई, ता. २५ (बातमीदार) : अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेऊन महाकाल उज्जैनकडे जाताना लुकवासा गावाजवळ वाहनांचा अपघात झाला. यात वसईतील वासळई येथील डॉ. नीलम पंडित यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे निर्मळ, भुईगाव या भागातील व्यावसायिकांनी मंगळवारी (ता. २५) दुकाने बंद ठेवत बंद पाळला. परिणामी, वर्दळीच्या मार्गावर शांतता पसरली होती.

डॉ. नीलम पंडित यांचे पती डॉ. सुबोध पंडित यांचा निर्मळ येथे दवाखाना आहे. रुग्णांसाठी हे दाम्पत्य नेहमीच धावून येतात. कोरोना काळात डॉक्टर सुबोध पंडित व यांच्या पत्नी डॉ. नीलम पंडित यांनी नागरिकांना धीर दिला होता. आरोग्यसेवेसाठी या दाम्पत्याने संपूर्ण आयुष्य वेचले, त्यामुळे डॉ. नीलम पंडित याना श्रद्धांजली अर्पण करीत गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. आपुलकीने नेहमीच रुग्णांना दिलासा द्यायच्या. त्यांचा अपघातात मृत्यू झाला यावर विश्वास बसत नाही. त्यांनी समाजहिताचे कार्य केले, ते विसरू शकत नाही, असे ग्रामस्थ सतीश जोशी यांनी सांगितले.
--------
वसई : डॉक्टर नीलम पंडित यांच्या मृत्यूनंतर व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com