ठाणे जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.२५ : क्षयरोग मुक्त ठाणे जिल्ह्यासाठी सुरु असलेल्या कामांची दाखल घेत केंद्र शासनाच्या सहसंचालक विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार क्षयरोग मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना कास्य तसेच रौप्य नामांकन देवून गौरवण्यात आले होते. आगामी काळात अधिक चांगली कामगिरी करून ठाणे जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केला. जागतिक क्षयरोग दुरीकरण दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाणे जिल्हा क्षयरोग विभागामार्फत जिल्ह्यातील टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान सुरू आहे. या अभियानात केंद्र शासनाच्या निर्देशांकानुसार व क्षय व कुष्ठरोग सहसंचालक आरोग्य सेवा यांचे मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यप्रणाली राबवत २८ ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्यात यश मिळविले आहे. या ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र तसेच सन्मान चिन्ह देवून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी १२ निक्षय मित्र, ४ टीबी चॅम्पियन यांना देखील प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. अशोक नांदापूरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------
चित्रकला, रांगोळीच्या स्पर्धा
जिल्हा क्षयरोग केंद्र कार्यालय व जी.एल.आर.ए. इंडिया (जर्मन लेप्रसी एन्ड टी बी रिलीफ असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये एन.के.टी. माध्यमिक ज्युनिअर महाविद्यालयातील २५० मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच नर्सिंग टी.एन.के.टी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीबी विषयक चित्रकला, रांगोळीच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

