

वाशी, ता. २५ (बातमीदार) : घणसोली विभागामधील थकीत पाणी देयकधारकांच्या विरोधात पालिकेने कंबर कसली असून, एक हजार ७०० थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे. यातील ४५० थकीत पाणी देयकधारकांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहे. नळजोडण्या खंडित करण्यात येत असल्यामुळे देयकधारक पाणीबिल भरत असून, पालिकेला घणसोली विभागातून अभय योजना सुरू झाल्यापासून ७० लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मालमत्ताकरांची अभय योजना सुरू केल्यांनतर आता पाणी देयकधारकांसाठीसुद्धा अभय योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर थकीत पाणीबिलधारकांच्या विरोधात पालिकेने कंबर कसली आहे. घणसोली विभागामध्ये ४५०च्या सुमारास थकीत पाणीबिलधारकांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पालिकेचे उपअभियंता अजित भवारी व कनिष्ट अभियंता नितीन जाधव यांच्या पथकाने थकीत पाणीबिलधारकांना दणका देण्यास सुरुवात केलेली आहे. घणसोली विभागामध्ये एक हजार ७००च्या सुमारास थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे; तर ४५० जणांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. आपल्या नळजोडण्या खंडित होऊ नयेत, यासाठी थकबाकीदार पैसे भरत आहेत. पालिकेला अभय योजना सुरू झाल्यापासून घणसोली विभागातून ७० लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.