शहापूर तालुक्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’

शहापूर तालुक्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’

Published on

किन्हवली, ता. २५ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे १०० दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत १ मार्चपासून राज्यात सर्व ठिकाणी जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सारमाळ गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मृत खातेदारांच्या वारसांच्या सातबाऱ्यावरील नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणींचे निरसन केले.
सारमाळ सजाचे तलाठी राधा घुले यांनी गावपाड्यांमध्ये स्वतः जाऊन राजीव गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना, मृत व्यक्तींचे वारस हक्क नोंदणी करणे, शेतकऱ्यांचे वादग्रस्त रस्ते खुले करणे, असे तत्सम योजनांचे अर्ज भरून तेथील ग्रामपंचायत कार्यालयांना भेट देत, जिवंत सातबारा मोहिमेचे काम सुरू केले आहे. या कामांचा आढावा घेताना तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी प्रत्यक्ष सारमाळ ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच मृत खातेदारांच्या वारसांच्या सातबारावरील नोंदीच्या प्रक्रियेचाही आढावा घेतला.
---------------------------------------
नोंदी नसल्याने अडचणी
मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करण्याच्या दृष्टीने तालुक्यात मोहीम राबविण्यात येत आहे.
---------------------------------------------------
शासकीय लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संपर्क करावा. तसेच सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये करण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे.
- परमेश्वर कासुले, तहसीलदार, शहापूर
----------------------------------------------
किन्हवली : सारमाळ येथील जिवंत सातबारा मोहिमेचा शहापूरच्या तहसीलदारांनी आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com