सीसीटीव्ही प्रकल्पाला अडचणींचा फेरा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : शहरात घडणाऱ्या सोनसाखळी, वाहन चोरीच्या घटनांसह विविध गुन्ह्यांना जरब बसावी, यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने शहरात बसवण्यात येणाऱ्या तीन हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत; पण शहरातील रस्ते खोदकामासाठी ठाणे महापालिकेने परवानगी दिली नसल्याने हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयातील एक हजार ९९७ ठिकाणी सहा हजार ५१ इतके सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. राज्य शासनाने यासाठीच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ठाणे ते दिवा शहरात तीन हजार १६३ कॅमेरे बसविले जाणार आहेत; पण कॅमेऱ्यांच्या जोडणीसाठी वायर टाकावी लागणार असून शहरातील ३०० किलोमीटरचे रस्ते खोदावे लागणार आहेत. यासाठी ठाणे पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे परवानगीबाबत विचारणादेखील केली आहे. त्यामुळे ठाणे शहरात कोट्यवधींचा खर्च करून नूतनीकरण केलेले रस्ते पुन्हा खोदावे लागणार आहेत. त्यामुळे विद्युत खांबांवरून किंवा पदपथाजवळील भागातून कॅमेऱ्यांच्या वायर टाकण्याचा पर्याय पालिकेने दिला आहे.
-------------------------------------------------------
पोलिसांचा पुन्हा पत्रप्रपंच
ठाणे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकरिता आवश्यक असलेले खांब उभारणीसाठी पालिकेकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी अद्याप पालिकेने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता परवानगी मिळाल्यानंतर ठाणे पोलिस खांब उभारणीचे काम सुरू करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

