ठाण्यातील हुक्का पार्लर रडारवर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : हुक्का पार्लर व्यवसायावर गुन्हे दाखल केले तर तीन वर्षांची शिक्षा आहे; पण असे असताना ठाणे शहरात हुक्का पार्लरचालकांवर कोणतेही गुन्हे पोलिसांकडून दाखल होत नसल्याची खंत आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात व्यक्त केली होती. त्यानुसार गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शहरात शोधमोहीम सुरू करून ठोस कारवाईचे आदेश दिले आहेत.
ठाणे शहरात तरुण पिढी हुक्का पार्लर संस्कृतीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हुक्का पार्लरमुक्त ठाणे शहरासाठी लोकचळवळ उभारली, त्याला यश आले. पोलिसांनी ४० टक्के पार्लर सुरू असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी सभागृहात दिली. शहरात थेट पार्लर सुरू आहेत; पण हर्बलच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू आहेत. एवढेच नव्हे तर, परमिट रूमच्या मागेदेखील हा व्यवसाय सुरू आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. समाजमाध्यमांवर आकर्षक जाहिराती प्रसारित केल्या जात असून त्या ठिकाणी गेल्यावर हुक्का पार्लर असल्याचे आढळून येते. पोलिसांकडून या चालकांना व्यवसाय बंद करण्यासाठी फक्त समज दिली जाते; पण कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे केळकर म्हणाले.
----------------------------------------
अर्थकारणाचा संशय
ठाणेकर तरुणांना देशोधडीस लावणारे हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद करण्यामागे कोणते राजकारण आहे, अर्थकारण आहे, असा संतप्त सवाल केला. तसेच, शहरात कोम्बिंग ऑपरेशन करून हे व्यवसाय बंद करण्यात येतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

