महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम

महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम

Published on

वासिंद, ता. २५ (बातमीदार)ः कर्जत-जामखेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा तालीम संघाच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी वासिंदमध्ये पार पडली. या स्पर्धेत कुमार गट तसेच विविध वजनी गटांतील १४५ पैलवान सहभागी झाल्याची माहिती शहापूर तालुका कुस्ती संस्थेचे कार्याध्यक्ष जयराम चंदे, अध्यक्ष प्रकाश गोंधळी यांनी दिली.
ठाणे जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने शहापूर तालुका कुस्ती संस्था आणि स्वामी विवेकानंदनगर सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने मातीतील कुस्ती व मॅटवरील कुस्ती (गादी विभाग) प्रकारांत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पैलवानांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत ५७ किलो वजनी गटातून भिवंडी तालुक्यातील हेलकुंदे येथील यज्ञेश मसणे प्रथम, कुणाल पाटील द्वितीय आला. ६१ किलो वजनी गटात भिवंडीतील संजय देवाडकर प्रथम तर शहापूर तालुक्यातील अरुण पवार हा पैलवान दुसरा आला. ६५ किलो वजनी गटात चौधरी पाडा येथील तेजस वामन भंडारी प्रथम तर भिवंडी येथील राकेश अनंता जाधव द्वितीय आला. ७० किलो वजनी गटात कोन गावातील प्रणय बाळाराम पाटील प्रथम तर विकास गणेश पाटील हा द्वितीय आला. ७४ किलो वजनी गटात हेलकुंदे येथील स्वस्तिक आत्माराम वाकडे प्रथम तर भिवंडीतील कुशल पाटील हा द्वितीय आला. ७९ किलो वजनी गटात जुनादुरखी येथील निखिल पाटील प्रथम तर गोवे गावातील विकी पाटील द्वितीय आला. ८६ किलो वजनी गटात सरवली येथील तेजस माळी प्रथम तर जुनादुरखी येथील नीलेश पाटील द्वितीय आला. ९२ किलो वजनी गटात कोळीवली भिवंडी येथील आयुष चिमटे प्रथम आला. ९७ किलो वजनी गटात साखरोली येथील धनंजय पाटील प्रथम आला. १२५ किलो वजनी महाराष्ट्र केसरी गटातून कोनगाव येथील जय साईनाथ म्हात्रे हा प्रथम आला.
-----------------------------------------------------
स्पर्धेसाठी २५ पैलवानांची निवड
माती विभाग व गादी विभाग या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत २५ पैलवानांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली. यामध्ये माती विभागातील सात पैलवानांचा समावेश आहे. या वेळी स्पर्धेत निवड झालेल्या पैलवानांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com