म्हाडाच्या चितळसर येथील  १२०० घरांची जून अखेर लॉटरी

म्हाडाच्या चितळसर येथील १२०० घरांची जून अखेर लॉटरी

Published on

म्हाडाच्या चितळसर येथील १,२०० घरांची जूनअखेर लॉटरी
पाणीप्रश्न लवकरच सुटणार; भोगवटा प्रमाणपत्रही मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकत्याच काढलेल्या लाॅटरीला चांगला प्रतिसाद मिळालेला असतानाच आता ठाण्यातील चितळसर येथील सुमारे १ हजार २०० घरांची लाॅटरी जूनअखेर काढली जाणार आहे.
एकाच ठिकाणी मोठा गृहसाठा असतानाही पाणी नसल्याने प्रकल्पाला ओसी मिळू शकली नव्हती. मात्र आता ठाणे महापालिकेने पाणी पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा सुरू झाला की ओसी तत्काळ मिळू शकणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
म्हाडाने दरवर्षी राज्यभरात सुमारे ३० हजार घरांची लाॅटरी काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे वेगवगेळ्या मंडळांकडून तयार घरांची लाॅटरी काढण्यावर भर दिला जात आहे. गेल्या दीड वर्षात कोकण मंडळाने ठाणे आणि परिसरातील जवळपास १० हजार घरांची लाॅटरी काढली आहे. ठाण्यात चितळसर येथे म्हाडाच्या सुमारे १ हजार २०० घरांचा प्रकल्प पूर्ण आहे. हा प्रकल्प उंचावर असल्याने अद्याप ठाणे महापालिकेकडून पाणी मिळू शकलेले नाही. यामुळे हा प्रकल्प पूर्ण झालेला असतानाही ठाणे पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळू शकलेले नाही. नुकतीच म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची ठाणे पालिका आयुक्तांशी बैठक झाली असून, त्यामध्ये पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार चितळसर येथे मोठी पाण्याची टाकी तयार करून या प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ठाणे परिसरात
घर घेऊ इच्छिणाऱ्यांना संधी
हे काम मेअखेर होणार असून, त्यानंतर पालिकेकडून लगेच ओसी मिळू शकणार आहे. त्यामुळे जूनमध्ये प्रकल्पातील घरांच्या विक्रीसाठी स्वतंत्र लाॅटरी काढण्याचे नियोजन असल्याची माहिती कोकण मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे ठाणे परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com