आमदार विक्रांत पाटील यांनी घेतली सिडको नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण बैठक
नैना प्रकल्पाविषयी सिडको प्रशासनाची बैठक
नगरविकास राज्यमंत्र्यांनी घेतला अडचणींचा आढावा
नवी मुंबई, ता. २५ : नैना प्रकल्पातील अडचणींसंदर्भात विधिमंडळात आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. या विषयासंदर्भात तातडीने विशेष बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार पनवेल, उरणमधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडको प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. २५) मुंबईत पार पडली.
बैठकीदरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या बाधित घरांना नियमित करणे, शेतकऱ्यांच्या मूळ घरावर आरेखित केलेले इतर शेतकऱ्यांचे ४० टक्के प्लॉट तथा शेतकऱ्यांच्या घरांवर टाकली गेलेली गार्डन, ओपन स्पेसेस व इतर आरक्षणे याबाबत आरक्षण इतरत्र हलवण्यासंदर्भात तातडीने निर्णय करणे, गावठाणलगतच्या बांधकामांना नियमित करण्यासाठी यूडीसीपीआरमधील तरतुदी लागू करणे, पुनर्विकासाकरिता वाढीव एफएसआय देणे, बाधित शेतकऱ्यांच्या बांधकामांना योग्य मोबदला, तसेच पुनर्वसनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
सिडको प्रशासनाने नैनाविषयक प्रश्न सोडविण्यासंदर्भात मंत्रिमहोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली. आगामी काळात हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. या बैठकीला म्हाडाच्या कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, जेएमडी शंतनू गोयल, जेएमडी गणेश देशमुख, मुख्य भूसर्वेक्षण अधिकारी समाधान खटकाळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

