कुणाल कामराच्या सेटवर हल्ला करणारे शहरी नक्षलवादीच !

कुणाल कामराच्या सेटवर हल्ला करणारे शहरी नक्षलवादीच !

Published on

कुणाल कामराच्या सेटवर हल्ला करणारे शहरी नक्षलवादीच!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या सेटची शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते, साहित्यिक विविध क्षेत्रातील लेखकांनी व्यक्त केला आहे. आम्ही कुणाल कामरा यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत, मुख्यमंत्री तसेच पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या हल्लेखोरांवर शहरी नक्षलवाद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी एका पत्रकातून करण्यात आली.

कामरा यांच्या सेटवरील हल्ल्याचा निषेध करणाऱ्या पत्रकावर तुषार गांधी, डॉ. जी. जी. पारीख, आनंद पटवर्धन, चित्रा पालेकर, तिस्टा सेटलवाड, फिरोज मीठीबोरवाला, फारुख मापुस्कर, जावेद आनंद, जेरी पिंटो, राम पुनियानी, मेगासेसे विजेते संदीप पांडे, साहित्यिक शरद बाविस्कर यांच्यासह शंभरहून अधिक जणांनी स्वाक्षऱ्या केल्या. या पत्रकात नमूद करण्यात आले आहे, की ‘आम्ही हे मान्य करतो, की या लोकांमध्ये विरोधी विचार आणि मतांसह संवाद आणि चर्चेत सहभागी होण्याची बौद्धिक क्षमता नाही. विनोद आणि व्यंग्य समजण्याएवढी आकलनशक्तीदेखील त्यांच्यात नाही. त्यांच्या मर्यादांबद्दल सहानुभूती आहे; मात्र त्यांना शिक्षित करण्यासाठी आम्ही काम करू,’ असा टोला या पत्रकात लगावण्यात आला आहे. कुणाल कामरांचा निषेध व्यक्त करण्यासाठी खासगी हॉटेलच्या मालमत्तेची तोडफोड करून आपले शौर्य दाखवणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या या दहशतवादी कृत्याचा आम्ही निषेध करतो. हा एकप्रकारचा शहरी नक्षली दहशतवादाचा प्रकार असल्याचे या पत्रकात सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com