आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कार्यशाळा

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कार्यशाळा

Published on

कल्याण, ता. २५ (बातमीदार) : अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधनांची कार्यशाळा (एआय) ही साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या कल्याण येथील साकेत कॅम्पस येथे खासगी विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन संघटना (पुस्मा) यांच्या सहकार्याने सोमवारी (ता. २४) पार पडली. या कार्यशाळेत ६०हून अधिक शाळांचे विश्वस्त, मुख्याध्यापक, प्रशासक सहभागी झाले होते. यावेळी पुस्मा संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना रॉड्रिग्ज, साकेत ज्ञानपीठचे सचिव साकेत तिवारी, पुस्माचे सचिव डोमिनिक पॉल, भरत मलिक, ॲड. अशोक साळवे आणि अजित बालन उपस्थित होते.
डॉ. अर्चना रॉड्रिग्ज यांनी आजच्या शैक्षणिक वातावरणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वाढती भूमिका आणि विद्यार्थ्यांकडून तंत्रज्ञानाचा जलद अवलंब यावर भर दिला. तर, साकेत तिवारी यांनी शिक्षकांनी एआय साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज यावर भर देण्याचा सल्ला दिला. या वेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त संजय जाधव यांनी विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या परिवर्तनांवर आपले मत मांडले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे असोसिएट डीन (आंतरविद्याशाखीय) डॉ. सी. ए. चक्रदेव यांनी भविष्यात विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश करण्याची गरज व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com