शाह महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ उत्साहात
शाह महाविद्यालयाचा दीक्षान्त समारंभ उत्साहात
मुंबई, ता. २५ ः सेवा मंडळ सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाचा चौथ्या दीक्षान्त समारंभ महाविद्यालयात पार पडला.
सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दिलीप त्रिवेदी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी २०२३-२४चा वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख अतिथी डॉ. रूपेश राऊत यांचा परिचय परीक्षा विभागप्रमुख डॉ. दर्शना बूच यांनी करून दिला. महाविद्यालयाच्या सर्व मान्यवर विश्वस्तांच्या हस्ते डॉ. राऊत यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींना पदवी बहाल झाली, असे उच्च शिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक डॉ. रूपेश राऊत यांनी जाहीर केले. चार विद्यार्थिनींना सुवर्णपदक आणि प्रत्येक शाखेतील गुणवत्ताधारक विद्यार्थिनी अशा २४ विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन डॉ. शुभांगी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सरिता कासलकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

