शाळेवर ताब्यात घेण्यावरून वाद
शाळेवर ताबा घेण्यावरून वाद
आठवले गटाचा प्रयत्न आंबेडकर समर्थकांनी उधळला
वाशी, ता. २५ (वार्ताहर) : नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरच्या सेक्टर-१मधील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु आनंदराज आंबेडकर यांच्या समर्थकांकडून हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. आनंदराज आंबेडकर हे संस्थेचे अधिकृत अध्यक्ष आहेत; परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी आरपीआयकडून (आठवले) प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांना आठवले गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी (ता. २५) काही लोकांकडून सीबीडी सेक्टर-१ येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सेंट्रल स्कूलमध्ये ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत कळताच आनंदराज आंबेडकर समर्थक आणि शाळेच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य आशीष गाडे यांनी शाळेत पोहोचून आठवले गटाचा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेमुळे दोन्ही गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
-----
हस्तक्षेप योग्य नाही
पीपल्स सेंट्रल स्कूलच्या नावाने काढलेल्या एका ऑर्डरचा हवाला देऊन, शाळा ताबा घेण्याचा आठवले गटाकडून प्रयत्न सुरू आहे. मुळात संस्थेबाबत अनेक निकाल धर्मादाय आयुक्त आणि सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना अशा पद्धतीने ऑर्डर देता येत नाही. आनंदराज आंबेडकर गेली अनेक वर्षे या संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. ते चांगले काम करीत असताना आठवले यांनी संस्थेमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे आशीष गाडे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

