दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिसंवाद

दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिसंवाद

Published on

दोनदिवसीय राष्‍ट्रीय परिसंवाद
मुंबई ः दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार), साठ्ये महाविद्यालय (हिंदी विभाग) आणि साहित्यिक सांस्कृतिक संशोधन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय पारंपरिक कला व संस्कृतीमध्ये रोजगाराच्या संधी या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन २८ आणि २९ मार्च रोजी साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले (पूर्व) येथे करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था एम. कार्लेकर, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, समन्वयक प्रा. डॉ. प्रदीप कुमार सिंह, सहसमन्वयक प्रा. डॉ. संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या परिसंवादात डॉ. अर्जुन चव्हाण, प्रा. केतन भोसले, सुरेशचंद्र तिवारी, डॉ. भगवतीप्रसाद उपाध्याय, रमा शंकर शुक्ल सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे माध्यम समन्वयक म्हणून प्रा. गजेंद्र देवडा कार्य करीत आहेत. प्राचार्य डॉ. माधव राजवाडे आणि उपप्राचार्य डॉ. सूरज पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसंवादाचे नियोजन सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com