माजी नगरसेवकाची 
उपशहर प्रमुखास मारहाण

माजी नगरसेवकाची उपशहर प्रमुखास मारहाण

Published on

माजी नगरसेवकाची
उपशहरप्रमुखास मारहाण
पाण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : श्रेयवादातून कल्याण पश्चिमेत शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला पक्षातीलच एका महिलेने मारहाण केल्याची घटना ताजी असताना आणखी एक मारहाणीची घटना कल्याण पूर्वेत मंगळवारी घडली. शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकाने पक्षाच्याच उपशहरप्रमुखाला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या आवारातच मारहाण केली. दिलीप दाखिनकर असे जखमी उपशहरप्रमुखाचे नाव असून, मल्लेश शेट्टी यांनी त्यांना मारहाण केली.
कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर येथील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या वहिनी असलेल्या माजी नगरसेविका तसेच शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप दाखिनकर यांच्यात पाणीपुरवठा समस्या सोडवण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यातून हे प्रकरण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेले. या वेळी दाखिनकर व शेट्टी हे समोरासमोर आले असता, शेट्टी यांनी धारदार शस्त्राने दिलीप दाखिनकर यांच्या डोक्यावर हल्ला केला. हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यात, या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
---
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
पोलिसांसमोर मारझोड करीत मल्लेश शेट्टी दहशत पसरवत आहेत. आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करणार, अशा इशारा दिलीप दाखिनकर यांनी दिला. तर दाखिनकर हे खोटे आरोप करीत आहेत. पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत काहीही संबंध नाही, तरीही माझी बदनामी केली जात असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com