राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल

Published on

विद्यार्थी आत्महत्येची
बालहक्क आयोगाकडून दखल
जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला अहवाल
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : सीवूड्स येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवव्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) दखल घेतली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दहा दिवसांत अहवाल पाठवण्याचे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले आहेत. त्यानुसार शिनगारे यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.
पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने ७ फेब्रुवारी रोजी शाळेतील पाचव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज देण्यास उशीर केल्याचा तसेच तपासास सहकार्य करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मृत मुलाच्या वडिलांनी केला होता. या विद्यार्थ्याचा शाळेमध्ये छळ होत असल्याची तक्रार त्यांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत आयोगाने जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले. तसेच, गुन्हा दाखल करण्याची गरज असल्यास तो दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासाचा संपूर्ण अहवाल, तक्रारींची नोंद, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य संबंधित कागदपत्रे १० दिवसांच्या आत सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com