रसरशीत ताडगोळे पनवेलमध्ये दाखल

रसरशीत ताडगोळे पनवेलमध्ये दाखल
Published on

रसरशीत ताडगोळे पनवेलमध्ये दाखल
यंदा डझनसाठी १८० रुपयांचा भाव; डहाणू येथून सर्वाधिक आवक
पनवेल, ता. २७ (बातमीदार) ः कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने लिंबूपाणी, उसाचा रस, सरबत अशा शीतपेयांना मागणी वाढली आहे. त्‍यातच पनवेलच्या बाजारात रसरशीत ताडगोळे दाखल झाले असून, त्‍याच्‍या खरेदीला पनवेकरांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे डहाणू येथूनही ताडगोळे पनवेल येथे विक्रीसाठी आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
उन्‍हाळ्यात ताडगोळे, शहाळे यांना मोठी मागणी असते. त्‍यामुळे उन्‍हाळ्यात ताडगोळ्यांची किंमत वाढलेली असते. यंदादेखील पनवेलमध्ये ताडगोळे महागात विकले जात आहेत. मागील वर्षी १२० रुपयाला १२ ताडगोळे मिळत होते; यंदा मात्र १८० रुपये डझन ताडगोळे मिळत आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली वाढू लागली आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे फळांचे मोसमही ठरलेले आहेत. नैसर्गिक पाण्याने भरलेले हे फळ चवीलाही गोड असते. तसेच या फळामुळे शरीराला गारवा मिळतो. ताडाच्या झाडावर येणारे ताडगोळे तयार झाल्याने त्याची विक्री सुरू झाली आहे. ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यात मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे प्रतिकारक शक्‍ती मजबूत होण्यास मदत होते. ताडगोळ्यामध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी ही जीवनसत्वं आढळतात. एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरते.
...................
झाडावर चढणाऱ्यांची संख्या घटली
आरोग्यासाठी गुणकारक असल्याने या ताडगोळ्यांना दिवसेंदिवस मागणी वाढू लागली आहे. ताडाच्या उंच झाडांवर चढणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने ती उतरविण्याचा खर्च वाढला आहे. त्‍यामुळे ताडगोळे महाग झाल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा उष्णता जास्‍त असल्याने ताडगोळ्यांची विक्री जादा होणार असल्याचे विक्रेता मंगळ्या कातकरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com