लाईव्ह न्यूज

वागळेत उच्च क्षमता उपकेंद्र उभारा

वागळेत उच्च क्षमता उपकेंद्र उभारा
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : महाराष्ट्र शासनाने वागळे येथे पहिली एमआयडीसी वसाहत स्थापन करण्यात आली होती. या ठिकाणी औद्योगिक वसाहती कमी झाल्या असल्या तरी या ठिकाणी नवनवीन आयटी पार्क उभे राहिले आहेत. या परिसरात महावितरणचे उच्च क्षमता वीज उपकेंद्र असावे, अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. एमआयडीसी मोठ्या प्रमाणात विकास शुल्क वसूल करते. त्याशिवाय नुकताच एमआयडीसीतर्फे परिसरात काहीही सुविधा देता अर्बन ट्रान्सपोर्टच्या नावाखाली जवळपास विकास शुल्काएवढीच १०० टक्के रक्कम आकारण्यास सुरुवात केली आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान पार्कच्या टोलेजंग इमारतींमुळे वागळे इस्टेट येथील विजेची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील सब स्टेशन ६० वर्षे जुनेच आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त उपकेंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे महावितरण, एमआयडीसीशी सल्लामसलत तातडीने उपलब्ध भूखंडावर अतिरिक्त उच्च क्षमतेचे उपकेंद्र तातडीने उभारावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com