सार्वजनिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

सार्वजनिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
Published on

भिवंडी, ता. २७ (वार्ताहर)ः आरोग्य व स्वच्छता विभागांतर्गत संबंधित अभियंता, आरोग्य अधिकारी, प्रभाग आरोग्य निरीक्षक, सफाई मुकादम, रस्ता सफाई कर्मचारी, गटार सफाई कर्मचारी, शौचालय व ड्रेनेज व्यवस्थापन कर्मचारी, कचरावेचक, महिला स्वयंसहाय्यता बचत गट प्रतिनिधी, घनकचरा संकलन मजूर यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण स्वच्छ भारत अभियानअंतर्गत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेमार्फत सुरू असून, बुधवारी भिवंडी महापालिका मुख्यालयात प्रशिक्षण आयुक्त अनमोल सागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. या प्रशिक्षण सत्रास अतिरिक्त आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नासिक विभागाचे विभागीय संचालक जीवन सोनवणे तसेच सर्व उपायुक्त मोठ्या संख्येने स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त अनमोल सागर यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामावेळी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन स्वच्छता करावयाची असल्याचे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com