दूध दरवाढीने खिशाला कात्री

दूध दरवाढीने खिशाला कात्री
Published on

भिवंडी, ता. २७ (वार्ताहर)ः रमजानमध्ये दुधाची मागणी वाढत असल्याने दूध विक्रेत्यांनी अघोषित दरवाढ केली आहे. आठवडाभरापूर्वी ८८ रुपये लिटरवर असलेले दर सध्या ८४ रुपयांवर आले आहेत. पण ईदच्या दिवशी हा दर ९० रुपयांवर जाण्याचा अंदाज नागरिक वर्तवत आहेत.
मुस्लिमबहूल शहर असलेल्या भिवंडी शहरात सध्या रमजान महिना सुरु आहे. उन्हाचा कडाका वाढत असताना सायंकाळी उपवास सोडताना इफ्तार वेळी थंडगार दुधाचे पदार्थ खाण्यास पसंती दिली जाते. त्यामुळे शहरात दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भिवंडी शहरात चहाची दुकाने मोठ्या प्रमाणात असल्याने मुस्लिम युवक नागरिक रात्री मध्यरात्री चहाच्या दुकानांवर मोठी गर्दी करत आहेत. अशातच शहरातील सुट्टे दूध विक्री करणारे दुधाच्या किमतीत मनमर्जीप्रमाणे वाढ झाल्याने विक्रेत्यांनी चहाच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. सध्या शहरात १२ रुपयांला मिळणारा चहा १७ रुपयांवर गेला आहे. तर काही ठिकाणी १० रुपये किमतीला मिळणारा चहा १२ रुपयांना विकला जात आहे. तर मिठाई व्यावसायिकांनी प्रतिकिलो मिठाईच्या दरात वाढ केली आहे.
-------------------------------------
दिवसाला ६० हजार लिटरची विक्री
शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कामगारांच्या मुलांना पिण्यासाठी दूध अत्यावश्यक असल्याने वाढलेल्या किमतींची झळ कामगार वर्गाला बसत आहे. दुधाच्या म्हशींच्या वाढलेल्या किमती, म्हशींचे खाद्य असलेल्या पेंडी, चुनी, भुसा यामध्ये भाववाढीच्या मानाने ही दूध दरवाढ नगण्य असल्याचा दावा विक्रेत करत आहेत. शहरात ६० हजार लिटर शुद्ध भेसळाविरहित दूध सकाळीच भिवंडी शहरात वितरित होत आहे.
--------------------------------------
दरवाढ नगण्य असल्याचा दावा
दुग्धविकास विभागाकडून दुग्ध व्यावसायिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात मिळत आहे. त्याचा लाभ ठाणे जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिकांना मिळत नाही. त्यामुळे येथील दुग्ध व्यावसायिकांकडून होणारी दरवाढ नगण्य असल्याची प्रतिक्रिया भिवंडी दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आनंद गद्रे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com