पर्यावरणपूरक शवदाहिनी वापराविना धूळखात

पर्यावरणपूरक शवदाहिनी वापराविना धूळखात
Published on

बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : कुळगाव बदलापूर नगरपालिकेने साधारण दीड वर्षापूर्वी शहरातील मोहनानंदनगर येथील पालिकेच्या स्मशानभूमीत आणि बेलवली येथील गावकीच्या स्मशानभूमीत जवळपास तीन ते साडेतीन कोटींचा खर्च करून बसवलेल्या पर्यावरणपूरक शवदाहिनी वापराविना आजही धूळखात पडलेल्या आहेत. बेलवली येथील स्मशानभूमीत शवदाहिनी बसवण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. यासाठी पालिकेत पत्रव्यवहार करून शवदाहिनी बसवू नका, असे सांगितले. तरी शवदाहिनी बसवण्यात आल्या. त्यां‍चा एकदाही वापर न झाल्याने धूळखात पडल्या आहेत.

भिवंडी लोकसभेचे खासदार तथा तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी त्यांच्या खात्यातून बदलापूर पालिकेला प्रदूषणमुक्त बदलापूरसाठी काही पर्यायी उपाय करण्यासाठी पर्यावरणपूरक शवदाहिनी बसवण्यासाठी तीन ते साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. पालिकेने या निधीचा वापर म्हणून बदलापूर पश्चिमेकडील मोहनानंद नगर येथील पालिकेच्या स्मशानभूमीत दोन पर्यावरणपूरक शवदाहिनी उभारल्या. मुंबईच्या धर्तीवर बनवण्यात आलेल्या या बंदिस्त दाहिनीमध्ये शव ठेवण्यात येतो. यात कमी लाकडांचा वापर होऊन आतील उष्णतेने मृतदेहावर अंतिम संस्कार होतील आणि होणारा धूर हा मोठ्या धुरकांडीतून बाहेर पडेल, अशी व्यवस्था आहे. बेलवली गावातील स्मशानभूमीतही अशा दोन शवदाहिन्या याच निधीतून उभारण्यात आल्या. या दाहिनीत प्रेत अर्धवट जळलेला अवस्थेत राहतात. तसेच, परंपरेप्रमाणे आम्हाला कोणत्याच विधी यावेळी करता येत नाहीत. त्यामुळे या शवदाहिनींना तीव्र विरोध दर्शवला. त्यात पालिकेच्या मोहनानंदनगर येथील स्मशानभूमीत देखील, या शवदाहिनीत प्रेत अर्धवट जळलेल्या अवस्थेत राहतात, अशी तक्रार करत ग्रामस्थांनी या शवदाहिनीवर अंतिम संस्कार करण्यास पाठ फिरवली. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करून बसवलेल्या शवदाहिनी आजही धूळखात पडलेल्या आहेत.

बेलवली स्मशानभूमी गावकीच्या मालकीची आहे. पिढ्यानपिढ्या या ठिकाणी घरातील मृत व्यक्तीवर परंपरेप्रमाणे अंतिम संस्कार करतो. त्यात या नव्या शवदाहिनीमुळे प्रेताभोवती फेऱ्या मारता येत नाही. मडके फोडता येत नाही, अग्नी देता येत नाही, परंपरेप्रमाणे विधी करता येत नाहीत. त्यामुळे हे युनिट बसवत असतानाच आम्ही विरोध करूनही पालिकेने या शवदाहिन्या या ठिकाणी बसवल्या आहेत. मात्र याचा वापर कोणीही करत नाही.
- किशोर पाटील, ग्रामस्थ, बेलवली गाव

पर्यावरणपूरक शवदाहिनी प्रकल्प राबवला, त्यावेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी मी नव्हतो. यातील तांत्रिक बाबी जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी याबाबत संपूर्ण माहिती घेऊन प्रकल्पाबाबत योग्य माहिती देऊ शकेन.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी,
कुळगाव बदलापूर नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com