

अंधेरीतील बंद सिग्नल पुन्हा सुरू
वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना दिलासा
जोगेश्वरी, ता. २७ (बातमीदार) ः अंधेरी पूर्व व जोगेश्वरीतून स्थानक परिसरात जाणाऱ्या जुन्या नागरदास मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण पडत होता आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी धावपळ करावी लागत होती. यासंदर्भात २१ मार्च रोजी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत येथील सिग्नल पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
अरुंद रस्त्यावरच चारचाकी वाहने रस्यावर उभी करून खरेदी-विक्री होत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर होती. येथे सर्वच ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होती, परंतु जुना नागरदास रोडवरील सिग्नल व्यवस्था गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने याचा नाहक त्रास वाहनचालकांसह सर्वसामन्य करदात्या नागरिकांना सहन करावा लागत होता. बंद सिग्नलमुळे अपघाताची शक्यताही वाढली होती. त्यातही वाहतूक पोलिस व महापालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचे चित्र नेहमी पाहावयास मिळत होते.
सहार येथील वाहतूक पोलिसांनी ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत सिग्नलमधील बिघाड दुरुस्त केले. सिग्नल व्यवस्था पुन्हा सुरू झाल्याने वाहतूक कोंडी दूर झाली आहे. सिग्नल व्यवस्था पुन्हा बंद पडू नये, यासाठी खबरदारी घेणार असल्याचे सहार वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार दुर्गेस जयस्वाल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.