वसईत दोन दिवस पाणीसंकट

वसईत दोन दिवस पाणीसंकट
Published on

वसई, ता. २७ (बातमीदार) : वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या एमएमआरडीए योजनेजवळ विजेच्या रोहित्रामध्ये मंगळवारी (ता. २५) बिघाड निर्माण झाला. याचा परिणाम बुधवारी (ता. २६) कमी आणि अनियमित दाबाने पाणी शहरासाठी आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. वसईतील काही भागात शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) पाणीपुरवठा बंद राहण्याचे जाहीर केल्याने पाणी समस्या उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.

वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या एमएमआरडीए योजनेच्या कवडसा पंपिंग स्टेशन येथील महावितरण विभागाचे ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने मंगळवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीला वेळ लागला. त्यामुळे आज अनियमित, कमी दाबाने पुरवठा झाला. वीज संकटामुळे वसई-विरार शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. शुक्रवारी सकाळी ५ ते शनिवारी सकाळी ५ वाजेपर्यंत वसईतील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यात वसईतील नवघर पूर्व, रामदास नगर, संभाजी नगर, आझाद नगर, संत जलराम नगर, एव्हरशाईन, वसंत नगरी, आचोळा, मधूबन विभाग, परेरा नगर या भागातील वितरण पूर्णपणे बंद राहील, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com