अंबरनाथला नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन

अंबरनाथला नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन
Published on

अंबरनाथ, ता. २७ (बातमीदार) : गुढीपाडव्यानिमित्ताने अनेक वर्षांपासून निघणारी नववर्ष स्वागतयात्रा अंबरनाथमध्ये यंदाही जल्लोषात निघणार आहे. भारतीय नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने २३ वर्षांपासून शहरामध्ये नववर्षाला स्वागतयात्रा काढण्यात येते. यंदा समितीच्या अध्यक्षा सरिता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्षा पूजा जाधव आणि कार्यवाह प्रमोद नाटेकर; तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी (ता. २३) अंबरनाथमध्ये स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. पूर्वेकडील खेर विभागातील हेरंब मंदिरातून यात्रेला रविवारी (ता. ३०) सकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना वंदन करून सकाळी १०.३० वाजता हुतात्मा चौकात यात्रेची समाप्ती होईल. विविध समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच सामाजिक संदेश यात्रेद्वारे दिला जाणार आहे. यात्रेमध्ये शहरातील विविध भजनी मंडळे, शैक्षणिक, सामाजिक संस्था, नृत्य आणि लेझीम पथकांच्या ढोल-ताश्यांच्या गजरात उत्साही वातावरणात स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com