फेरीवाला समितीवर महिला राज

फेरीवाला समितीवर महिला राज
Published on

ठाणे फेरीवाला समितीवर महिलाराज
आठपैकी पाच जागा महिलांसाठी राखीव
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे महापालिका क्षेत्रातील फेरीवाला धोरण प्रत्यक्षात उतरत आहे. ११ एप्रिल रोजी फेरीवाला समितीची निवडणूक पार पडणार असून त्यातील आठ जागांसाठीचे आरक्षण पालिकेने जाहीर केले आहे. आठपैकी पाच जागा महिलांसाठी राखीव असल्याने फेरीवाला समितीवर महिलाराज दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापलिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण पथकासह सहाय्यक आयुक्तांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासह फेरीवाला धोरण राबविण्याचा विषय चर्चेला आला. २०१९ मध्ये ठाणे पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार, शहरातील सहा हजार फेरीवाल्यांपैकी केवळ दोन हजार फेरीवाल्यांनी कागदपत्रे प्रशासनाकडे जमा केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. फेरीवाला धोरण निश्चित करताना, फेरीवाल्यांची संख्या एक हजार ३६५ निश्चित करण्यात आली. सध्या ३० जणांची फेरीवाल्यांची समिती आहे; मात्र आता नव्याने समिती तयार होणार असून त्यात २० जणांचा समावेश असणार आहे. त्यापाठोपाठ पालिकेने समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून येत्या ११ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. समितीचे सदस्य म्हणून नोंदणीकृत पथविक्रेत्यांमधून पाच वर्षांसाठी निवड केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी सांगितले.
---
समितीचे आरक्षण
सर्वसाधारण गट (महिला राखीव) ३
अनुसूचित जाती (महिला राखीव) १
अनुसूचित जमाती १
इतर मागास वर्ग १
अल्पसंख्याक १
विकलांग व्यक्ती (महिला राखीव) १
एकूण ८
----
प्रभाग समितीनिहाय मतदार
प्रभाग समिती पुरुष महिला एकूण
माजिवडा-मानपाडा ८५ २४ १०९
वर्तकनगर १४३ ३९ १८२
लोकमान्यनगर-सावरकरनगर १३५ ३९ १७४
वागळे ९४ १४ १०८
नौपाडा-कोपरी २७६ ६५ ३४१
उथळसर १६५ ७२ २३७
कळवा ६२ २८ ९०
मुंब्रा ७२ १७ ८९
दिवा ०८ २७ ३५
एकूण १,०४० ३२५ १,३६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com