कामगार विरोधी धोरणावर आज ''कामगार संमेलन''

कामगार विरोधी धोरणावर आज ''कामगार संमेलन''
Published on

कामगारविरोधी धोरणावर आज ‘कामगार संमेलन’

शिवडी, ता. २७ (बातमीदार): केंद्र सरकारच्या कामगारविरोधी चार श्रम सहितेंनी कामगारवर्गाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यातच राज्य सरकारकडून येऊ घातलेल्या, महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकाने कामगारांचा लोकशाहीतील गळा घोटला जाणार आहे. त्या‌विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी कामगारांनी मोठ्या शक्तीनिशी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य कृती संघटना अध्यक्षीय समिचे सदस्य, महाराष्ट्र इंटक, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी कामगारांना केले आहे.
कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. २८) मुंबईत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात दुपारी २ ते ५ या वेळेत राज्यस्तरीय कामगार संमेलन आयोजित करण्यात आले‌ आहे. त्याला कामगारवर्गाने‌ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे‌ आवाहन सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाला पुढे बोलताना केले आहे.
कामगार संमेलनात १५ मागण्यांचा ठराव मंजूर करण्यात येईल व २० मे ही राष्ट्रीय संपाची घोषणा करण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. या संमेलनास राज्यातील सर्व प्रमुख कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या लढ्यात इंटक, आयटक, एच.एम.एस, ए.आय.यू.टी.यू, सी.आय.टी.यू., टी.यू.सी.सी., एस.इ.डब्ल्यू.इ, एल.पी.एफ यू.टी.यू.सी. या कामगार संघटना सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com