नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामाचे आता दररोज नियोजन

नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामाचे आता दररोज नियोजन
Published on

अभियंत्यांवर नालेसफाई
नियोजनाची जबाबदरी

दररोज संगणकीय प्रणालीत भरावी लागणार माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पूर्व उपनगरांमध्‍ये नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. मोठ्या व छोट्या नाल्‍यांतून गाळ काढण्‍यासाठी दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंत्यांना दररोज नालेनिहाय व दिवसनिहाय नियोजन करावे लागणार आहे. तसेच त्याबाबत संगणकीय प्रणालीमध्‍ये माहितीही भरावी लागणार आहे. ३१ मेपर्यंत नाले स्‍वच्‍छतेची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजित बांगर यांनी दिले.

नालेसफाईच्या कामांची गुरुवारी (ता. २७) अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजित बांगर यांनी पाहणी केली. मेट्रो रेल्‍वे, मध्‍य रेल्‍वे व्‍यवस्‍थापन यांच्‍याशी समन्‍वय साधून प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वी करायच्या मोठ्या व लहान नाल्यांतून गाळ काढण्याची कामे मंगळवारपासून सुरू झाली आहेत. शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द नाला, देवनार नाला, लक्ष्‍मीबाग नाला, पूर्व द्रुतगती महामार्गावरील जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्‍ता (जेव्‍हीएलआर) येथील कल्‍वर्ट, भांडुप येथील दयानंद अँग्‍लो वेदिक (डीएव्‍ही) महाविद्यालय नाला, स्‍वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील नाला, एपीआय नाला आणि उषानगर नाला येथे प्रत्‍यक्ष भेट देत बांगर यांनी नाल्यांमधून गाळ काढण्याच्‍या कामांचा आढावा घेतला.
----
पर्जन्य जलवाहिनी मेट्रोमुळे बाधित
मानखुर्द येथील नाल्याची पाहणी त्यांनी केली. नाल्याच्या बाजूची २५० मीटर पर्जन्य जलवाहिनी मेट्रो कामामुळे बाधित झाली आहे. मेट्रो व्यवस्थापनाने हे काम पावसाळ्यापूर्वी सुरू करणे गरजेचे आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी  मेट्रो व्यवस्थापनासमवेत समन्वय साधून हे काम पूर्ण करावे, असे निर्देश अभिजित बांगर यांनी दिले.
--
जाळ्या लावण्याचे निर्देश
देवनार नाल्याच्या दुतर्फा भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. नाल्याच्या ठिकाणी जाळी लावली असता ती चोरीस जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी फायबर रिइन्फोर्सड पॉलिमरच्या जाळ्या लावाव्यात, अशा सूचनादेखील अभिजित बांगर यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com