

महिला शहराध्यक्षावर
खंडणीचा गुन्हा दाखल
घरासह भाजयुमो कार्यालयाची तोडफोड
ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) ः भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पाच लाखांच्या खंडणीच्या प्रकारातून ही घटना घडल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
महात्मा फुले नगर येथील धनंजय शिवराम बिस्वाल हे त्यांच्या जागेत बांधकाम करीत असताना सुशीला डोंगरे, सुजाता पांचाळ आणि अन्य एकाने काम बंद पाडून धनंजय यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष तथा माजी नगरसेविका वनिता गोतपगार यांनी बांधकाम सुरू ठेवायचे असेल, तर पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. धनंजय यांनी खंडणीस नकार दिल्याने २३ फेब्रुवारी रोजी सुशीला डोंगरे, सुजाता पांचाळ, वनिता गोतपगार आणि इतर तीन-चार जणांनी धनंजय आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली तसेच घरावर दगडफेक केली. धनंजय यांच्या घराशेजारी असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चा कार्यालयाचे सीसीटीव्ही फोडून खुर्च्यांची मोडतोड केली. भाजयुमो कार्यालयातील अमित मिश्रा आणि विजयपांडी नाडर यांच्यासह धनंजय यांनी वनिता गोतपगार व इतरांविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात २५ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.
----
वाद सोडविण्यासाठी गेले होते
घर बांधताना झालेल्या वादातून सुजाता पांचाळे यांनी मला तिथे समाजसेवक म्हणून बोलावले. मी त्यांच्यातील भांडण मिटवले, परंतु धनंजय यांनी तुम्ही माझ्याकडून का बोलला नाहीत, असा राग धरून तसेच मागासवर्गीय असल्याने माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेला मदत करण्यासाठी मी तेथे गेले होते, असे वनिता गोतपगार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.