भिवंडीत टोळक्याची तरुणाला मारहाण

भिवंडीत टोळक्याची तरुणाला मारहाण
Published on

भिवंडीत टोळक्याची तरुणाला मारहाण
भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : प्रेम जुळविण्यास मदत न केल्याच्या रागातून एकाला पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडी शहरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशनबाग परिसरातील एका इमारतीत १८ वर्षीय उस्मान हैसियत अली खान हा तरुण राहतो. तर त्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेम जुळवून आणण्यासाठी खिजर पटेल याने या मुलीसोबत बोलणे करून देण्यासाठी उस्मानकडे तगादा लावला होता. त्यास उस्मानने नकार दिल्याने त्याचा राग मनात धरत रात्रीच्या सुमारास खिजर पटेल याने फोन करून उस्मान यास परशराम टावरे स्टेडियमच्या गेटवर बोलवले. याठिकाणी उस्मान मित्र फरहानसोबत गेला असता येथे खिजर पटेल याने हॉकी स्टीकने उस्मान याच्या नाकावर तर त्याचे साथीदार, खालीद, सैफ, सिफान व सादिकने लोखंडी पंचने तसेच हाताच्या ठोशाबुक्क्याने उस्मानला जबर मारहाण केली. या वेळी मध्यस्थी करणाऱ्या फरहानलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उस्मानने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com