

कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी बरखास्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाच्या पक्षातील उपशहरप्रमुख ते संघटकपदापर्यंतच्या सर्व महिला, पुरुष पदांना स्थगिती देण्यात आली आहे. कामाचा आढावा घेऊन, मुलाखती घेऊन पुढील नेमणुका केल्या जातील, असे पत्र पक्षातील जिल्हाप्रमुखांनी काढले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची आयात केली गेली आहे. यामुळे पक्षांतर्गत धुसफूस वाढली आहे. नुकतेच कल्याणमध्ये शिंदे गटाच्या पक्षांतर्गत असलेल्या दोन गटांत जोरदार राडा झाल्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी कार्यकारिणीत नवनियुक्तीचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
कल्याण पूर्व विभागातील शिवसेना शिंदे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी पत्र काढले आहे. या आदेशामुळे कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुख ते संघटकपदापर्यंतची कार्यकारिणी या आदेशामुळे रद्द झाली आहे. गेल्या पाच दिवसांत कल्याण पूर्व, पश्चिमेत शिंदे शिवसेनेतील दोन गटांमध्ये हाणामारी, अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्यामुळे शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समजते. यामध्ये शिंदे गटातील एका माजी नगरसेवकाला पक्षातीलच एका महिला सदस्याने मारहाण केली होती. कल्याण पूर्वेत शाखेतील उपोषणावरून पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे. पक्षाने नियुक्त्या न करता शिंदे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी ‘स्वयंघोषित’ पदाधिकारी होऊन वावरत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले होते. याविषयीच्या अनेक तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्या होत्या, असे पदाधिकारी सांगत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर या पक्षातील पदांमध्ये सुसूत्रता असावी, नियोजन पद्धतीने स्थानिक पातळीवर पक्षाचे कामकाज चालावे म्हणून कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुखपदापर्यंतच्या सर्व पदांना स्थगिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.