

भर चौकात गावगुंडांकडून पत्रकाराला मारहाण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : कल्याण ग्रामीण भागातील एका पत्रकारावर गावगुंडांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गावागावातील बातम्या प्रकाशित करीत असल्याने मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिळ डायघर पोलिस ठाण्यावर धडक दिली. शिळफाटा चौकात शुक्रवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास या पत्रकाराला मारहाण करण्यात आली. शिळ गावातील भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रकाशित करीत असल्याने गावगुंडांनी त्याला मारहाण केली आहे. सध्या जखमी पत्रकारावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पत्रकाराचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती शिळ डायघर पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांकडून आरोपींचा शोधदेखील सुरू करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.