

वाहनचालकाचा हृदयविकाराने मृत्यू
नवी मुंबई (वार्ताहर) : नेरूळच्या स्टर्लिंग महाविद्यालयातील विश्रांतीगृहात एका चालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपक हिंगे (वय ४५) असे या चालकाचे नाव असून गुरुवारी (ता. २७) दुपारी महाविद्यालयात दुर्गंधी पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हिंगे यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
मृत दीपक हिंगे हे मूळचे अंबेगाव येथील असून ते यशवर्धन डहाके यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होते. डहाके हे मुंबईत आल्यानंतर हिंगे हे सोमवारी नेरूळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयातील आठव्या मजल्यावर असलेल्या विश्रांतीगृहात आराम करीत होते; मात्र झोपेतच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, विश्रांतीगृहात झोपलेल्या हिंगे यांना पाहण्यासाठी दोन दिवस कुणीच गेले नाही, त्यामुळे गुरुवारी दुपारी हिंगे यांच्या मृतदेहाची महाविद्यालयात दुर्गंधी पसरली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी विश्रांतीगृहात जाऊन शोध घेतला असता दीपक हिंगे हे मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी स्टर्लिंग महाविद्यालयात धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. हिंगे यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.