

‘एसआरए’चे रखडलेले
तीन प्रकल्प म्हाडाकडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : म्हाडाच्या भूखंडावरील वर्षानुवर्षे रखडलेले तीन एसआरए प्रकल्प म्हाडाने पूर्ण करावे म्हणून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे संबंधित तिन्ही एसआरए योजना पूर्ण करून संबंधित रहिवाशांना हक्काचे घर देणे म्हाडाला शक्य होणार आहे.
आर्थिक निधीची चणचण, रहिवाशांचे थकीत भाडे अशा वेगवगेळ्या कारणांमुळे मुंबईतील अनेक एसआरए प्रकल्प रखडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रखडलेले एसआरए प्रकल्प म्हाडा, एसआरए, सिडको अशा सरकारी संस्थांच्या मादतीने मार्गी लावण्याचे निर्देश एसआरएला दिले होते. त्यानुसार म्हाडाने एकूण २१ प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत एसआरएशी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार एसआरएने जोगेश्वरी येथील साईबाबा सहकारी गृहनिर्माण संस्था, कुर्ला नेहरूनगर येथील श्रीमकनगर संस्था व चेंबूर येथील जागृती संस्था हे तीन प्रकल्प म्हाडाला देण्यास मंजुरी दिली आहे. तसेच उर्वरित १८ प्रकल्प घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.